Skip to main content


त्र्यंबकेश्वर मध्ये त्रिपिंडी श्राध्द पूजा|Tripindi Shradh त्रिपिंडी श्राद्ध पूजा त्र्यंबकेश्वर मध्येच का करावी? त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग हे अतिप्राचीन असे धार्मिक स्थळ आहे. जीवात्म्यास मुक्ती देणारे त्रिमूर्ती श्री ब्रह्मा-विष्णु-महेश ज्योतिर्लिंग स्वरूपात निवास करतात आणि पित्रांना सद्गती प्रदान करणाऱ्या गौतमी गोदावरी नदीचे उगमस्थान त्र्यंबकेश्वर हे असल्याने दरवर्षी इथे श्रद्धाळू त्रिपिंडी श्राद्ध विधी करण्यासाठी एकत्र येतात. त्रिपिंडी श्राद्ध पूजा कुशावर्त तीर्थावर केली जाते.